पुणे प्रतिनिधी । नागरीकांना सूचना देण्यासह त्यांच्या तक्रारींचे तात्काळ निरसन व्हावे म्हणून देशभरातील पोलीस सध्या ट्विटरवरून नागरिकांसोबत कनेक्टेड आहेत. तुम्हाला काहीही अडचण आली तर फक्त एक ट्विट करण्याची गरज आहे आणि पोलीस तुमच्या ट्विटची दाखल घेत तुमची अडचण समजून घेत कारवाईचे आश्वासन देतात.असं चित्र बरेचदा पाहायला मिळत. हे करत असताना पोलिसांचे हे ट्विटर हँडेल बरेचदा नियम तोडणाऱ्यांना किंवा अपप्रकार करणाऱ्यांना मिश्कीलपणे समज देतात. असाच काहीसा अनुभव देणार पुणे पोलसांचे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे.
ट्विटरवर एका तरुणाने ट्विटरवर एका मुलीला तिचा फोन नंबर ट्विटरवर मागितला. मात्र फोन नंबर मागणे या तरुणाच्या चांगलचं अंगलट आलं ज्यावेळेस पुणे पोलिसांनी त्याला खास पुणेरी उत्तर दिलं.
संबंधित तरुणाचे फोन नंबर मागणे या मुलीला धोक्याचे वाटल्याने. या मुलीने ट्विटरवर पुणे पोलिसांना टॅग करत धानोरी पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक मागितला होता. त्याच्या उत्तरादाखल पुणे पोलिसांनी हा फोन क्रमांक शेअर केला. त्यानंतर पुन्हा एका मुलाने खोडसाळपणा केला. या मुलाने पुणे पोलिसांकडे चक्क त्या मुलीचा फोन क्रमांक मागितला. त्यावर पुणे पोलिसांनी कमी शब्दात खास समज त्याला दिली.
Sir, we are more interested in your number currently, to understand your interest in the lady’s number. You may DM. We respect privacy. https://t.co/LgaD1ZI2IT
— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 12, 2020
@abirchiklu या नावाचा युजर असणाऱ्या त्या तरुणाने महिलेच्या ट्विटवर या मुलीचा फोन क्रमांक मिळू शकेल का? असे विचारले. त्याच्या ट्विटवर अनेक युजर्सने त्याच्यावर टीका केली होती. अखेर पुणे पोलिसांनी उत्तर दिल्यानंतर अनेकांनी पोलिसांचे कौतुक केले.
पुणे पोलिसांनी म्हटले की, सर सध्या तरी आम्हाला तुमच्या फोन क्रमांकामध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही आम्हाला थेट मेसेज करू शकता. आम्ही त्याबाबत गुप्तता बाळगू असे पोलिसांनी म्हटले.