Moosewala Murder Case : सौरभ महाकाळनंतर आता संतोष जाधवला पुणे पोलिसांकडून अटक

sidhu moosewala
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला प्रकरणी (Moosewala Murder Case) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी सौरभ महाकाळनंतर आता दुसरा आरोपी संतोष जाधवला अटक केली आहे. त्याला पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. या प्रकरणात (Moosewala Murder Case) एकूण आठ आरोपी असल्याचे समोर आले होते. त्यापैकी पुण्यातील सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव या दोघांची नावे समोर आली होती.

संतोष जाधव हा सिद्धू मूसेवाला हत्याकांडात (Moosewala Murder Case) वॉन्टेड संशयित होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी मूसेवाला खून प्रकरणातील संशयित जाधव याच्या साथीदारालाही अटक केली आहे. संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी जाधवच्या टोळीतील आणखी एकाला या प्रकरणी (Moosewala Murder Case)अटक केली आहे. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.

नेमकं काय घडलं होतं?
पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मूसेवाला यांची (Moosewala Murder Case) मानसा या ठिकाणी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेत सिद्धुचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता. पंजाबमधील भगवंत मान सरकारने 424 महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये सिद्धू मुसेवाला यांचाही सामावेश होता. सुरक्षा काढून घेतल्याच्या ठीक एका दिवसानंतर ही घटना घडली होती.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर