पुणे । पुण्यातील एका आमदाराच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. एका सहकारी बॅंकेसंदर्भातील घोटाळ्याबाबत हे छापे असल्याचे सांगण्यात आले. यावर पोलिस लवकरच अधिकृत माहिती देतील, असे स्पष्ट करण्यात आले.
याआधी एका सहकारी बॅंकेतील तब्बल 72 कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या अपहारप्रकरणी सदर आमदारावर आमदारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. सहकार कायद्यातील तरतुदींनुसार नुकसानीस जबाबदार असलेल्यांची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार आहेत. ही धाड संपत्ती जप्त करण्यासाठी झाली की प्रकरणाच्या तपासासाठी झाले, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
पोलिसांच्या या धाडीत संबंधित आमदाराच्या आलिशान गाड्या, किमती वस्तू यावर जप्ती आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात आणखी काही जणांवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे. यात पुणे जिल्हा परिषदेचा माजी पदाधिकारी असलेल्या नेत्याचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेचे रिझर्व्ह बँकेने 2018-19 चे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्यात 71 कोटी 78 लाख रुपये कमी आढळले होते. त्यानंतर या बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात आली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.