पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पुणे स्टेशन परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. पुण्यातील 39 वर्षांच्या रिक्षावाल्याने या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आहे. या आरोपी नराधमाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे. हि अल्पवयीन पीडित मुलगी रस्त्याच्या कडेला आपल्या आई शेजारी झोपलेली असताना या रिक्षावाल्याने मुलीला उचलून नेलं. या मुलीचं वय 6 वर्षे असल्याचं समजत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पुणे रेल्वे स्टेशनपासून आईच्या शेजारी झोपलेली असताना रात्री साधारण 1 च्या सुमारास या 6 वर्षांच्या मुलीला उचलून रिक्षात घालून मार्केटयार्ड परिसरामध्ये नेलं. तिथं नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. थोड्या वेळाने जेव्हा आईच्या लक्षात आलं की मुलगी शेजारी नाही ती गायब झाली आहे. तेव्हा ती लगेच समोर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली.
त्यानंतर पोलिसांनी लगेच या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यांनंतर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा आरोपी नराधम त्या मुलीला मार्केट यार्ड परिसरात घेऊन गेल्याचे दिसले. तिथे गेल्यानंतर पोलिसांनी आरोपीला शोधून काढले व त्याला अटक केली. या अल्पवयीन मुलीवर सध्या उपचार सुरु आहेत.