पुण्यातील शाळा, कॉलेज ‘या’ तारखे पासून सुरू; अजित पवारांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्यातील कोरोना रूग्णसंख्येत घट होत असून आगामी १ फेब्रुवारी पासून पुणे जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय सुरु होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. पहिली ते ८ वीचे वर्ग ४ तास भरवले जातील तर ९ वि पासून पुढील वर्ग पूर्णवेळ भरवण्यात येतील असेही अजित पवार यांनी सांगितलं

एक आठवडा ४ तास शाळा सुरु राहील. त्यानंतर आढावा घेतला जाईल. जर करोना रुग्णसंख्या कमी राहिली तर पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा देखील पूर्णवेळ सुरु राहणार आहेत. ३० आणि ३१ जानेवारीदरम्यान शाळांमधील स्वच्छता आणि इतर बाबी शाळा प्रशासनातर्फे पाहिल्या जाणार आहेत.

15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण शाळेतच करणार आहोत. पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. त्यामुळे शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मास्क मुक्ती संदर्भात मंत्रिमंडळात कुठलीच चर्चा झाली नाही. ती बातमी चुकीची आहे. आपल्याकडे मास्क लावणे अनिवार्य, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.