पुणे | पुणे शहरात करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता काल(2एप्रिल) पुण्याचे पालक मंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक बैठक घेतली आणि बैठकीमध्ये पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील सर्व धार्मिक स्थळ आज पासून (3एप्रिल ) 9 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे बहुतेक मंदिरांच्या बाहेर बंद असल्याचा फलक दिसून येत आहे. पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिरात देखील मंदिर समितीच्या वतीने बाहेर मंदिर बंद असल्याचे फलक लावलेले दिसून येत आहे. त्यामुळे भाविक बाहेरूनच मंदिराचे दर्शन घेताना दिसत आहेत.
पुण्यात सायंकाळी 6 नंतर संचारबंदी
पुण्यात काही दिवसांसाठी अंशतः लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. पुण्यात 12 तासांचा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचार बंदी असेल. बार हॉटेल रेस्टॉरंट सात दिवस बंद राहणार फक्त होम डिलिव्हरी करण्यास परवानगी आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाही फक्त मर्यादित लोकांचा अंत्यविधी आणि विवाह सोहळे होतील. अंत्ययात्रेसाठी जास्तीत जास्त 20 आणि लग्नासाठी जास्तीत जास्त 50 लोक उपस्थित राहू शकतील. सर्व धार्मिक स्थळे ही सात दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. हे नवीन नियम 3 एप्रिल पासून म्हणजे आज पासून लागू होत आहेत.
दरम्यान नऊ एप्रिल 2019 ला पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
Maharashtra: All religious places in Pune to remain completely closed till April 9th in the wake of the #COVID19 situation. Visuals from Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir where people pray outside as the temple remains closed. pic.twitter.com/94M1pXDV5u
— ANI (@ANI) April 3, 2021
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page