हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्य रेल्वे सध्या अनेक हिताचे निर्णय घेत आहे. त्यामध्ये अतिरिक्त गाड्या सोडणे, प्रवाश्यांसाठी नवीन रेल्वे सुरु करणे यामुळे प्रवाश्यांना सणासुदीतही प्रवास करण्यास दिलासा मिळतो. त्याचप्रमाणे याहीवेळी मध्य रेल्वेने पुणे – अजनी – पुणेसह तब्ब्ल 36 गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गाड्या कोणत्या असतील आणि त्यांचे वेळापत्रक कसे असेल याबाबत जाणून घेऊयात.
कोणत्या आहेत या गाड्या?
मध्य रेल्वेकडून सोडल्या जाणाऱ्या या गाड्या म्हणजे गाडी क्रमांक 01465 सुपरफास्ट साप्ताहिक स्पेशल पुणे ट्रेन आणि 01466 सुपरफास्ट विशेष अजनी या दोन गाड्या यासाठी सज्ज असणार आहेत. याशिवाय मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -थिवी – मुंबई, पुणे – करमळी पुणे, पनवेल – करमळी – पनवेल या गाड्यांचाही समावेश असणार आहे.
कसे असेल वेळापत्रक?
गाडी क्रमांक 01465 ही गाडी 26 डिसेंबर आणि 2 जानेवारी रोजी दुपारी 3:15 वाजता पुणे येथून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे 4:50 ला अजनी नागपूर स्थानकावर पोहचेल. तसेच गाडी क्रमांक 01466 ही गाडी 27 डिसेंबर आणि 3 जानेवारीला अजनी नागपूरहुन रात्री 7: 50 निघून सकाळी 11:35 वाजता पुणे येथे येऊन पोहचेल. त्यामुळे प्रवाश्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे अशी आशा व्यक्त केली जात आहे.
कोणत्या ठिकाणी जातील गाड्या?
सोडल्या जाणाऱ्या या स्पेशल गाड्या मनमाड, कोपरगाव, दौण्ड , दोरमार्ग, भुसावळ, नांदुरा, अकोला, बडनेरा, वर्धा आणि धामणगाव या ठिकाणी या गड्या जातील. त्यामुळे इथल्या प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे.
या गाड्या एकूण 22 कोचच्या असून त्यात तीन एसी टू टियर, 15 थर्ड एसी आणि 2 जनरेटर व्ह्यानचा समावेश असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांचा प्रवास हा सुखकर होणार असून त्याचा फायदा नागरिकांना होईल या उद्देशाने मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.