Pune To Amravati Train : पुणे- अमरावती रेल्वेच्या फेऱ्या वाढणार; कसे असेल वेळापत्रक?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रविवारी दिवाळी असून अनेकजण आपापल्या गावी चालले आहेत. त्यातच एसटी बसेसच्या तिकीट दरात वाढ झाल्याने अनेक प्रवासी रेल्वेचा मार्ग अवलंबत आहेत. साहजिकच रेल्वेला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सुखद प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वे विभाग प्रयत्नशील आहे. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने प्रवाश्यांसाठी पुणे – अमरावती – पुणे (Pune To Amravati Train) या विशेष गाडीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. आजपासून म्हणजेच 10 नोव्हेंबर पासून या विशेष गाड्या धावणार आहेत.

एकूण होणार 186 फेऱ्या- Pune To Amravati Train

10 नोव्हेंबर ते 11 फेब्रुवारी 2024 पर्यंत या गाडीच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. त्यामुळे एकूण 186 फेऱ्या गाडीच्या होतील. ही गाडी नवीन निर्णयामुळे सकाळी 11 वाजता पुणेवरून निघेल तर मध्यरात्री 00.55 ला अमरावतीला पोहचेल. तर अमरावतीवरून रात्री 10:50 ला निघून सकाळी 11:25 वाजता पुण्याला येऊन थांबेल. गाडीला एकूण 17 एलएचबी डब्बे राहणार असून त्यामध्ये द्वितीय श्रेणी चेयर कार 13, एसी चेयर कार श्रेणी 1, स्लीपर श्रेणी 1, द्वितीय श्रेणी एसएलआरच्‍या 2  डब्‍यांचा समावेश असणार आहे. यामुळे प्रवाश्यांना चांगलाच फायदा होईल अशी अशा व्यक्त केली जात आहे.

कोणत्या ठिकाणावर थांबणार ही रेल्वे ?

या गाडीच्या वाढलेल्या फेऱ्यामुळे (Pune To Amravati Train) ही गाडी बेलापूर, कोपरगाव, भुसावळ, जळगाव, अहमदनगर, पाचोरा, मनमाड, उरळी, दौंड कॉर्ड लाईन, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा या रेल्‍वे स्‍थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे येथील प्रवाश्यांची प्रवासाची सोय झाली आहे. असे म्हणायला हरकत नाही.