हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सणासुदीचे दिवस संपल्यानंतर आता नवीन वर्षाची चाहूल लागली असून त्यास केवळ एक महिनाच राहिला आहे. चालू वर्षाला निरोप देण्यासाठी तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण गोव्याला जाण्याचा प्लॅन आखत असतात. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करता लागू नये आणि त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी रेल्वे कडून पुणे ते गोवा विशेष ट्रेन चालवण्याचा (Pune To Goa Train) निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे.
कसा असेल रूट?
पुणे – गोवा मार्गांवर (Pune To Goa Train) चालवल्या जाणाऱ्या यां स्पेशल ट्रेनचा रूट हा लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, थिविम, खेड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड या मार्गावर ही गाडी जाणार असून येथील प्रवाश्यांना घेऊन ती पुढे गोव्याला जाणार आहे. यामुळे प्रवाश्यांची होणारी गर्दी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसे असेल वेळापत्रक? Pune To Goa Train
पुणे ते गोवा (Pune To Goa Train) दरम्यान चालवली जाणारी ही गाडी 22 ते 29 डिसेंबर या दिवशी ही गाडी पुणे जंक्शन येथून संध्याकाळी 5:30 वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी 8:30 वाजता करमाळी येथे पोहोचणार आहे. तसेच गोवा ते पुणे दरम्यान 24 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी ही गाडी चालवली जाणार असून करमाळी येथून सकाळी 9.20 वाजता गाडी निघेल आणि रात्री 11.35 वाजता पुणे जंक्शनला पोहोचणार आहे. ही विशेष एक्सप्रेस ट्रेन करमाळी ते पुणे जंक्शन दरम्यान चालवली जाईल. त्यामुळे प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे. तुम्ही सुद्धा गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर रेल्वेचा हा प्रवास तुमच्यासाठी स्वस्तात मस्त आणि आरामदायी ठरू शकेल.