आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जुन्नर प्रतिनिधी | शिवाजीराव आढळराव पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराकडून हार पत्करावी लागली. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. कारण शिवसेनेचे पदाधिकारी पक्षातून हाकलून देण्याचा सपाटाच शिवसेनेने सुरु केला आहे. २००२ पासून शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या आशा बुचके यांना पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवून शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

आशा बुचके या २००२,२००७,२०१२, २०१७ अशा चार निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीला विजयी झाल्या होत्या. तर २००९ आणि २०१४ साली त्यांनी शिवसेनेकडून जुन्नर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र या दोन्ही निवडणुकीत आशा बुचके यांचा पराभव झाला होता. कोणत्याही राजकीय परिस्थितीत त्यांनी शिवसेनेला सोडले नाही. मात्र अंतर्गत वादामुळे त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत काम आढळराव पाटलांचे केले नाही. त्याचा आढळराव पाटील यांना मोठा फटका सहन करावा लागला.

शिवसेनेने शिरूर मधून पक्ष विरोधी काम करणारे शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख राम गावडे यांची देखील पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी शिवसेनेने माऊली कटके यांची जिल्हा प्रमुख पदी निवड केली आहे. त्याच प्रमाणे शिवसेना तालुका प्रमुखांची सुद्धा धरपकड सुरु केली आहे. काहींना पक्षातून तर काहींना पदावरून काढून टाकण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे.

1 thought on “आढळरावांचा पराभव ; ४ वेळा जि.प सदस्य म्हणून निवडून आलेल्या आशा बुचकेंची शिवसेनेतून हकालपट्टी”

  1. एकाचे मन धरलं की दूसरा नाराज होतो .
    तसेच इतर पक्षातून आलेल्या लोकांना टिकीट किंवा इतर पद दिले की आपोआपच पोटात गोळा येतो .
    हे प्रत्येक पक्षात घडत असतं .

    Reply

Leave a Comment