हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Punjab National Bank : देशभरातील करोडो पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत देशभरातील कोट्यवधी पेन्शनधारकांना या महिन्यात त्यांचे वार्षिक लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागणार आहे. मात्र, कर्मचारी पेन्शन योजना (EPScheme) च्या पेन्शनधारकांना एक दिलासा आहे की त्यांना वर्षभरात कधीही लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील.
अशा प्रकारे सबमिट करा लाइफ सर्टिफिकेट
हे लक्षात घ्या कि, लाइफ सर्टिफिकेट सबमिट करण्याचे अनेक मार्ग आहेत. यासाठी ट्रेझरी, बँक शाखा, कॉमन सर्व्हिस सेंटर आणि पोस्ट ऑफिसला भेट देऊन लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. त्याच बरोबर Punjab National Bank सहीत 12 बँकांच्या डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिस द्वारे देखील पेन्शनधारकांना डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सादर करता येतील. मात्र अनेक बँकांमध्ये डोअर स्टेप सर्व्हिससाठी शुल्क द्यावे लागते.
Pensioners get the best surprise gift this year! Submission of life certificate is now free through Doorstep Banking Service from 1-10-2022 to 31-01-2023.
For more information, visit: https://t.co/4q7Ihl8dev#DoorstepBanking #Pensioners #LifeCertificate #SurpriseGift pic.twitter.com/ZtGp58iS92
— Punjab National Bank (@pnbindia) November 3, 2022
पीएनबी डोअरस्टेप बँकिंगद्वारे फ्रीमध्ये सबमिट करा लाइफ सर्टिफिकेट
दरम्यान, Punjab National Bank ने सांगितले आहे की, “पेन्शनधारक डोअरस्टेप बँकिंग सर्व्हिसद्वारे लाइफ सर्टिफिकेट फ्रीमध्ये सबमिट करू शकतो. तसेच 1 ऑक्टोबर 2022 ते 31 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये ही मोफत सुविधा उपलब्ध असेल.” पंजाब नॅशनल बँकेने ट्विट करत ही माहिती दिली आहे.
अशा प्रकारे ऑनलाइन तयार करा लाइफ सर्टिफिकेट
पेन्शनधारकांना आपले लाइफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. आता लाइफ सर्टिफिकेट ऑनलाइनही तयार केले जाऊ शकते. यासाठी केंद्र सरकारचे अधिकृत लाइफ सर्टिफिकेट पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वरून डिजिटल पद्धतीने लाइफ सर्टिफिकेट तयार करता येतील. याबरोबरच आधार बेस्ड ऑथेन्टिकेशनद्वारे देखील डिजिटल सर्टिफिकेट तयार केले जाऊ शकते. Punjab National Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.pnbindia.in/doorstep-banking-services.html
हे पण वाचा :
Multibagger Stock : ‘या’ केमिकल कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 4000% रिटर्न !!!
Bank FD : ‘या’ बँकेच्या स्पेशल FD वर मिळेल 8.50 टक्के व्याज !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आज 141 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट
RBL Bank ने FD वरील व्याजदरात केला बदल, नवीन व्याजदर पहा
Multibagger Stock : ऑटो क्षेत्रातील ‘या’ कंपनीने अडीच वर्षात दिला तीन पट नफा