साताऱ्यात उदयनराजेंना धक्का : खेडशिवापूर, आणेवाडी टोलनाका घेतला काढून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : बहुचर्चित असलेला साताऱ्यातील आणेवाडी टोलनाका व खेड शिवपूरचा टोलनाका हा खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून काढून घेत शिवसेना व राष्ट्रवादीच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन तारखेपासून मॅनेजमेंट बदलणार असल्याने आणेवाडी टोलनाक्यावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आलेली आहे. आता टोलबाबत महाविकास आघाडीने घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या आनेवाडी आणि खेड शिवापूर या दोन टोलनाक्यावर आजपासून 5 टक्क्यांनी टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. याआधी 65 रुपये टोल आकाराला जात होता. मात्र, आता तो 70 रुपये करण्यात आला आहे. एकीकडे गेल्या 10 वर्षांपासून या महामार्गाच्या सहपदरी करणाचे काम अनेक ठिकाणी रखडलेले आहे आणि रस्ते खराब असताना देखील टोल वाढ मात्र केली जातेय. याबाबत वाहनधारकांनी नाराजी व्यक्त केली जात आहे. असे असतानाही या कामाचा ठेकेदार असलेल्या रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चर कंपनीला मात्र यंदाही टोलवाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. नेमकी दरवाढ किती झालीये आणि आजपासून किती टोल आकारला जाणार आहे.

1 ऑक्टोबर 2010 ला पुणे-सातारा रस्ता 6 पदरी करण्याचं काम सुरू झालं. 31 मार्च 2013 ला हे काम संपणे अपेक्षित होते, मात्र अद्याप काम अर्धवट आहे. आनेवाडी टोल नाक्याला मोटारी, हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरता 70 तर दुहेरी प्रवासाकरता 105, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे 110 आणि 170, बस किंवा ट्रककरता 235 आणि 350 तर मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 365 तर दुहेरी प्रवासाकरता ४५0 रुपये टोल द्यावा लागणार आहे.

Leave a Comment