हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pushkar Jog) मराठी अभिनेता पुष्कर जोग हा कायम रसिक प्रेक्षकांसाठी वेगळ्या कथानकाचे आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट घेऊन येत असतो. अलीकडेच त्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव ‘धर्मा – दि एआय स्टोरी’ असे असून या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण सुरु करण्यात आले आहे. या सिनेमाचे शूटिंग शेड्युल स्कॉटलंडमध्ये सुरु असून शूटिंग सेटवरून एक मोठी बातमी समोर येत आहे. अभिनेता पुष्कर जोगचा सेटवर अपघात झाला असून त्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे.
शूटिंग दरम्यान पुष्कर जोग जखमी (Pushkar Jog)
काही दिवसांपूर्वीच पुष्कर जोगने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती होती. मुहूर्ताचे फोटो शेअर करत त्याने चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित या चित्रपटाचे स्कॅाटलॅंडमध्ये चित्रीकरण सुरु आहे.
दरम्यान एक ॲक्शन सीन करताना झालेल्या अपघातात अभिनेता पुष्कर जोग याला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. दरम्यान, पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो पुन्हा एकदा चित्रीकरणाला सुरुवात करेल, असे सांगितले जात आहे.
‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच
एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे दिग्दर्शन स्वतः अभिनेता पुष्कर सुरेखा जोग (Pushkar Jog) करत आहे. तर या चित्रपटाच्या निर्मात्या तेजल पिंपळे आहेत. माहितीनुसार, या चित्रपटात अभिनेता पुष्कर सुरेखा जोगसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर दिसणार आहरेत. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी फक्त सोशल मीडिया आणि इतर गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. मात्र आता हाच विषय थेट मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे.