‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

0
52
20 rs note
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल तर लोक काय आयडिया वापरतील त्याचा काही नेम नाही. अशीच एक आयडिया म्हणजे पैशाच्या नोटेवर आपला प्रेमसंदेश लिहिणे.

अशी बरीच उदाहरणे आपण याअगोदर देखील पहिली असतील. काही दिवसांपूर्वी ‘सोनम गुप्ता बेवफा है’ असा संदेश लिहिलेली नोट मोठ्या प्रमाणात वायरल झाली होती. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे पण यामध्ये द्वेषाचा नाही तर प्रेमाचा संदेश आहे. विशेष म्हणजे यामधील मुलीने आपले ठरलेले लग्न मोडून प्रियकरासोबत पळून जाण्याचा निश्चय केला आहे.

२० रुपयांच्या नोटेवर हा संदेश लिहिला आहे. हि नोट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यामध्ये पुष्पाने दीपूसाठी एक प्रेमळ संदेश लिहिला आहे. पुष्पाने २० रुपयांच्या नोटेवर “प्रिय दीपू जी. माझे २६ एप्रिलला आहे. मला पळवून न्या. तुमची पुष्पा, आय लव्ह यू” असा प्रेमळ संदेश लिहिला आहे. पुष्पाने नोटेवर व्यक्त केलेली भावना दिपू पर्यंत पोचविण्यासाठी अनेकजण ती नोट वायरल करत आहेत. यामधील पुष्पा नावाच्या मुलीला दुसऱ्याकोणासोबत लग्न न करता आपला प्रियकर दिपूसोबत पळून जायचे आहे. आता या गोड प्रेमकहाणीचा शेवट काय होतो यांची कोणालाच कल्पना नाही आहे. पण हि २० रुपयांची नोट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here