पुतीन यांची हत्या हीच देशाची आणि जगाची मोठी सेवा ठरेल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून यामध्ये दोन्ही देशांचे नुकसान झालं आहे. युक्रेन ने आत्तापर्यंत रशियाला चिवट झुंज दिली आहे. या युद्धामुळे जागतिक स्तरावर रशियाला जोरदार विरोधही होत आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची कोणीतरी हत्या करावी, असे लिंडसे ग्रॅहम यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते यानंतरच हे युद्ध संपुष्टात येईल.

लिंडसे ग्रॅहम म्हणाले, ‘रशियातील कोणीतरी या माणसाला बाहेर काढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला मारणे. असे झाले तर देशाची आणि जगाची मोठी सेवा होईल. हे काम फक्त रशियन लोकच करू शकतात. रशियाच्या या दु:खद स्वप्नाचा अंत तेव्हाच होईल जेव्हा पुतीन यांना संपवलं जाईल. तुम्ही तुमच्या देशासाठी आणि जगासाठी उत्तम काम कराल’ असं अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी म्हंटल

दरम्यान बिडेन प्रशासनाने गुरुवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळच्या काही लोकांवर नवीन निर्बंध जाहीर केले. नव्या निर्बंधांतर्गत पुतीन यांचे प्रेस सेक्रेटरी दिमित्री पेस्कोव्ह आणि रशियन मोठे उद्योगपती अलीशेर बुर्हानोविच तसेच पुतीन यांचे आणखी एक जवळचे मित्र यांना लक्ष्य करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने 19 रशियन व्यावसायिक आणि त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्यावर व्हिसा निर्बंध लादत असल्याचेही जाहीर केले.