आर. आर. आबा : शाळेच्या वऱ्हांड्यात झोपणारा जिल्हा परिषद सदस्य

R R Patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी : विशाल पाटील

सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील अंजनी गावातील रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर. आर. पाटील उर्फ महाराष्ट्राचे आबा यांची (जन्म दि. 16 ऑगस्ट 1957) आज जयंती. आबांच्या जीवनातील काही किस्से

आर. आर. पाटील (आबा) हे इयत्ता चाैथीपासून पासून लग्न होईपर्यंत मंदिर, शाळेचा वऱ्हांड्यात झोपत असत. आर. आर. आबा जिल्हा परिषद सदस्य असताना जिल्हा परिषदेचा शाळेत पोत्यावर झोपलेले होते. रात्री उशिरापर्यंत जिल्हा परिषद गटात कार्यक्रम होता. दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा होती. शाळेत मास्तर आले, विद्यार्थी आले. मात्र मास्तरांना प्रश्न पडला आबांना उठवायच कसे, अखेर मुलांनी प्रार्थनेची घंटा वाजवली. तेव्हा आबांनी घंटा ऐकली अन् उठले. तेव्हापासून शाळेच्या वऱ्हांड्यात आबांनी झोपणे बंद केले. त्यानंतर लग्नापर्यंत आबा मंदिरातच झोपत होते.

आबांनी 8 रूपये हजेरी मिळाल्याने शरद पवारांना परवानगी दिली

आर. आर. आबा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार होते. आबा चाैथीत आणि सातवीत तालुक्यात पहिले होते. एसससी केंद्रात पहिले आले. पीडी आर्टसला सांगली शहरात पहिले आले होते. आबांना जुन्या एससीसीला 70 टक्के मिळाले होते. सायन्सला खर्च परवडणारा नसल्याने आर्टसला प्रवेश घेतला. काॅलेजला असताना खर्चासाठी पैसे मिळावेत म्हणून आबांनी नोकरी करण्याचा विचार केला होता. त्यामुळे सांगली कारखान्यात वाॅचमन, क्लार्क पदासाठी अर्ज केला होता. क्लार्क पदासाठी जागा नाही, तेव्हा आबांची तब्बेत बघून वाॅचमनची नोकरीही मिळाली नाही. शेवटी वर्तमान पत्रात जाहिरात वाचली कमवा आणि शिका. प्राचार्य पी. बी. पाटील आमदार होते, त्यांचा आग्रह होता, किमान 8 रूपये रोजगार मिळाला पाहिजे. तेव्हा आबांनी प्राचार्य पी. बी. पाटील यांची भेट घेतली आणि म्हणाले, तुमच्या काॅलेजला 4 रूपये न देता पाऊणेदोन रूपये का देताय असा प्रश्न विचारला. काही दिवसांनी काॅलेजचे गॅदरींग होते. या काॅलेजमध्ये मंत्र्यांना का बोलवतात. मंत्री चालणार नाही आणि मंत्र्यांना बोलवणार नाही आणि मंंत्र्यांना बोलवल तर गॅदरिंग होणार नाही, अशी भूमिका आबांनी घेतली. तेव्हा पी. बी. पाटील प्राचार्य यांनी शरद पवार यांना निमंत्रण दिले होते. त्यांनी आबांना सांगितले मी निमंत्रण दिले आहे. मग आबांनी एक अट घातली की आमची हजेरी आठ रूपये करावी. अखेर हजेरीचा करार मान्य झाल्याने शरद पवार यांना प्रमुख पाहुणे म्हणून परवानगी दिली.

जिल्हा परिषद ते उपमुख्यमंत्री 

आर. आर. आबा सन 1979 पासून सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून 1989 पर्यंत निवडूण आले होते. सन 1990 साली आबा पहिल्यांदा काॅंग्रेसच्या तिकिटावर निवडूण आले होते. नंतर 1999 मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करत  2004, 09, 2014 मध्ये तासगांव, कवठे महाकाळ मतदार संघातून निवडूण आले. आबांना मंत्रिमंडळाच्या स्थापनेच्या आदल्या दिवशी रात्री दीड वाजता शरद पवार यांनी फोन केला होता. तुम्ही उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहात. तेव्हा आर. आर. आबांना आपली कोणीतरी चेष्टा होतेय का असे वाटत होते. त्यामुळे रात्रीच त्यांनी दिलीप वळसे पाटील यांना फोन केला. तरीही अजून एकदा खात्री करावी म्हणून अजित पवार यांनाही फोन करून खात्री केली होती. आबा हे ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आणि 6 वेळा आमदार राहिले होते.