कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड :- साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर केलेले नाहीत तसेच त्याबाबत स्पष्टता नाही. भाव कमी देण्याची प्रथा पडायला लागलेली आहे. एफआरपीही देत नाहीत. ज्याच्या ताब्यात साखर कारखाने आहेत, तेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे या बेकायदेशीर वागणार्या कारखान्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. असा गंभीर आरोप रघुनाथदादा पाटील यांनी “हॅलो महाराष्ट्रशी” बोलताना केला आहे. तसेच बेकायदेशीर वागणार्या त्याकारखान्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली. शेतकर्यांला टनाला 4 हजार रूपये मिळायला पाहिजेत अशी आमची मागणी आहे. सहकार मंत्रीच दर जाहीर करू देत नाहीत. मंत्रिमंडळात ऐवढे मंत्री पश्चिम महाराष्ट्रातील आहेत त्यांचेच कारखानाने आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळा बरोबरच शेतकर्यांना दोन हात करण्याची वेळ आलेली आहे असेही रघुनाथदादा पाटील यांनी म्हंटल आहे.
आमदार- खासदारांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आत्महत्या
शेतकर्यांच्या आत्महत्येचा कलंक महाराष्ट्रावर व देशावर कलंक लागलेला आहे, तो पुसण्यासाठी ही जनप्रबोधन यात्रा काढण्यात आली होती. शेतीमालाचे भाव आणि ते भाव न मिळाल्याने होणारे कर्ज त्या कर्जामुळे होणार्या आत्महत्या… सरकारच्या धोरणामुळे कुबेर असणारा शेतकर्यांवर गरिबी आणि दरिद्रता आलेली आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत. जे आमदार- खासदार निवडूण गेलेेले आहेत त्याच्या दुर्लक्षामुळे शेतकरी आत्महत्या होत आहेत.असा आरोप त्यांनी यावेळी केला.
दिल्लीतील आंदोलनाचे राजकारण चालू, कृषी विधेयकामुळे शेतकर्यांच्यावर अन्याय होणार नाही
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या विधेयकामध्ये काही तांत्रिक दुरस्त्या आम्ही सुचविलेल्या आहेत, मात्र त्यामध्ये शेतकर्यांच्यावर काही फार मोठ्या अन्याय करणार्या गोष्टी नाहीत. आंदोलनात बाहेरील खलिस्तानी लोक घुसलेत, तेथे सरकार शेतकर्याला तर शेतकरी सरकारला दोष देत आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलन चुकीच्या दिशेला चाललेले आहे. या आंदोलनात राजकीय लोक घुसलेले आहेत हे स्पष्ट आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या आंदोलनाचे राजकारण व्हायला लागलेलं आहे.
राजू शेट्टी, सदाभाऊ खोतांकडून शेतकर्यांनी अपेक्षा करू नये, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांचा आरोप
एफआरपीपेक्षा जास्त दर का दिला जात नाही यासाठी आमचे भांडण आहे. स्वाभिमानी संघटना, रयत क्रांती या संघटना सरकार बरोबर आहेत, ते झाकून राहिलेले नाही. सदाभाऊ खोत भाजप तर राजू शेट्टी का्रग्रेस- राष्ट्रवादी बरोबर असल्याने त्याच्यांकडून काहीही अपेक्षा शेतकर्यांनी करू नये. शेतकर्यांनी शेतकरी नेत्यांच्यावर अवलंबून न राहता स्वतः लढलं पाहिजे. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत की रघुनाथ पाटील काय करतात हे पहात बसू नये. त्यांनी स्वतःच्या शेतातील मालाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’