हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन : क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकामध्ये भारतीय नेमबाज राही सरनोबतने २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारतासाठी नेमबाजी विश्वचषकातील हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. मराठमोळ्या राहीचे या ‘सुवर्ण’ कामगिरीबद्दल सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
सध्या क्रोएशियामध्ये नेमबाजीची वर्ड कप स्पर्धा सुरु आहे. जगभरातून मातब्बर नेमबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. भारतीय नेमबाज राही सरनोबत हिने या वर्डकप स्पर्धेत देदिप्यमान कामगिरी केली आहे. 40 पैकी 39 गुण मिळवून राहिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे.
क्रोएशियामध्ये सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकामध्ये भारतीय नेमबाज राही सरनोबतने २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मराठमोळ्या राहीचे या 'सुवर्ण' कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन! ऑलिंपिक स्पर्धेमध्येही अशीच उज्ज्वल कामगिरी तिने करावी यासाठी शुभेच्छा!
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 28, 2021
दरम्यान, राहिच्या या यशाचं कौतुक शरद पवार यांनीही केले आहे. मराठमोळ्या राहीचे या ‘सुवर्ण’ कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन! ऑलिंपिक स्पर्धेमध्येही अशीच उज्ज्वल कामगिरी तिने करावी यासाठी शुभेच्छा! अशा आशयाचे ट्विट पवार यांनी केले आहे.