हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी आता देशभरात १ मेपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होत असून, १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा कोरोनाची लस मोफत मिळायला हवी, अशी आग्रही मागणी केली आहे.
free /friː/
adjective, adverbcosting nothing, or not needing to be paid for. e.g.-
• India must get free COVID vaccine.
• All citizens must receive the inoculation free of charge.Let’s hope they get it this time. #vaccine
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 29, 2021
भारताला कोविडची लस मोफत दिली पाहिजे. सर्व नागरिकांना विनामूल्य रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. आशा करूया की यावेळी त्यांना ती मिळेल, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
दरम्यान, राहुल गांधी हे नेहमीच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात. आणि केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करत असतात. राहुल गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली असून ते विलगीकरणात आहेत.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.