राहुल गांधींनी जम्मू- काश्मीरमध्ये फडकवला तिरंगा (Video)

0
221
rahul gandhi lal chawk tiranga
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीर पर्यंत आली आहे. आज त्यांनी श्रीनगरमधील (Srinagar) लाल चौकातील ऐतिहासिक क्लॉक टॉवरवर भारताचा तिरंगा (Tiranga) फडकावला. यावेळी त्यांच्यासोबत बहीण प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. राहुल गांधी तिरंगा फडकावत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच जोसह आणि उत्साह पाहायला मिळाला.

लाल चौकात राहुल गांधींच्या हस्ते ध्वजारोहणासाठी सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने लाल चौकाच्या सभोवतालचा संपूर्ण परिसर सील करण्यात आला. तसेच दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. लाल चौकात तिरंगा फडकावण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम गायले आणि त्यानंतर राहुल गांधींच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. राहुल गांधी आज संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषदही घेणार आहेत.

दरम्यान, लाल चौकातून भारतीय ध्वज फडकवून आम्ही दाखवून दिले आहे की, या देशात फक्त प्रेम, माया आणि बंधुताच पाहायला मिळेल. इथे कोणाचा द्वेष, तिरस्कार चालणार नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी दिली. आज या देशाचा पंतप्रधान कोणीही असलं तरी येथील 140 कोटी जनता त्यांच्यापेक्षा मोठी आहे. या देशातील नागरिकच भारताचा झेंडा आहेत असं म्हणत आज आपण देशाला पुन्हा एकदा आम्ही जोडत आहोत असेही ते म्हणाले.