नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोशल मिडीयावर लष्करी जवानांची कुत्र्याशी तुलना केल्याने देशभरातून राहुल गांधी यांच्या बद्दल संताप व्यक्त केला जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या जवानासोबत श्वान पथकातील कुत्री योग साधना करत असल्याचे फोटो न्यूज मीडियाने प्रदर्शित केले होते. त्यातील एक फोटो ट्विटरवर टाकून राहुल गांधी यांनी त्या फोटोवर न्यू इंडिया असे कॅप्शन दिले. त्यामुळे देशभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
New India. pic.twitter.com/10yDJJVAHD
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 21, 2019
आज आंतराष्ट्रीय योग दिन असल्याने सरकारच्या सर्वच घटकाने योग साधना करून हा दिवस साजरा केला. तसेच भारतीय लष्कराने देखील भारताचा पारंपारीक गौरव असणाऱ्या योगाचे धडे गिरवले आहेत. मात्र याची राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांची घोषणा वापरून खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या कृत्याचा भाजपाचे खासदार तेजस्वी सुर्या यांनी चांगलंच समाचार घेतला आहे. राहुल गांधी यांनी एका फटक्यात भारतीय लष्कर, शूर जवान, श्वान पथक, योग परंपरा आणि देशाचा अपमान केला आहे. अशा नेत्या सोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जुळवून घ्यावे लागते हि खूप मोठी शोकांतिका आहे असे खासदार तेजस्वी सुर्या यांनी म्हणले आहे.
राहुल गांधी यांच्या काँग्रेसला देशाचे लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर नाकारले आहे. अशा अवस्थेत राहुल गांधी यांच्या वक्तव्याने काँग्रेसबद्दल अधिकच संतापाची लाट उसळली आहे. आगामी दोन दिवसात या वक्तव्याचा सर्वच स्तरातून निषेद नोंदवला जाणार आहे असे चित्र सध्या देशात आहे.