मी ज्योतिरादित्यला चांगलं ओळखतो ; राहुल गांधींनी सांगितले काॅलेज पासून सोबत असणार्‍या मित्राचे काँग्रेस सोडण्याचे ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दिल्ली | मी ज्योतिरादित्य सिंधिया यांना खूप चांगलं ओळखतो. मी आणि ज्योतिरादित्य काॅलेजमध्ये सोबत होतो असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना गांधी यांनी सिंधिया यांच्या भाजप प्रवेशाबाबत आपले मत व्यक्त केले.

सध्या देशात विचारधारेचे युद्ध सुरु आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष उभा आहे तर दुसर्‍या बाजूला भाजप, आरएसएस उभा आहे. मला ज्योतिरादित्य सिंधियांची विचारधारा माहिती आहे. आम्ही दोघे काॅलेजला सोबत होतो. मी सिंधिया यांना खूप चांगला ओळखतो. असे म्हणत राहुल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपली विचारधारा गुंडाळून भाजपात प्रवेश केल्याच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली.

यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया आपल्या राजकिय भविष्याबाबत चिंताग्रस्त होते. आणि म्हणुनच त्यांनी आपली विचारधारा गुंडाळून भाजपात प्रवेश केला असं मत गांधी यांनी व्यक्त केले. सिंधिया यांचा भाजप प्रवेश राहुल गांधी यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आम्हाला या नंबरवर 8080944419 WhatsApp करा आणि लिहा “Hello News”