मुंबई | भक्तांच्या सुपीक डोक्यात कधी काय पिकेल याचा अंदाज बांधणं कठीणंच, असाच एक फोटो सध्या मोदी समर्थकांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. त्या फोटोच्या माध्यमातून काॅंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची फिरकी घेण्यात आली आहे.
‘जिनकी तस्वीर को भी हिला न सकी कोई आँधी उनका क्या बिगाडेगा कोई गांधी’ असं कॅप्शन त्या फोटोला दिलं आहे. नवमहाराष्ट्राचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस या फेसबूक ग्रूपवर हा फोटो पोस्ट केला आहे.
ओडिसा राज्यात फॅनी चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. या पार्ष्वभूमिवर मोदी भक्तांनी हा फोटो शोधून काढत मोदींना मोठ्यातलं मोठं फॅनी वादळ देखील हलवू शकत नाही तेथे गांधी काय करतील असा संदेश दिला आहे. फॅनीच्या तडाख्यालाही मोदी समर्थकांनी राजकीय रंग दिला आहे.
सन १९९९ नंतर भारताला धडकणारे सर्वाधिक घातक वादळ असे भाकित वर्तविण्यात आलेले ‘फॅनी’ चक्रीवादळ ओदिशाच्या किनारपट्टीला धडकले आहे. ओडीशाच्या अनेक भागात सोसायटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. या वादळाने रौद्ररूप धारण केले असून तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्याचं कार्य वेगाने सुरू आहे.