हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारले असता त्यांनी सर्वांचे मन जिंकणारे उत्तर दिले. मी पंतप्रधान झाल्यास महिलांना आरक्षण देईन असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.
तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या गोष्टीची शिकवण द्याल या एका महिलेने विचारलेल्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, मी माझ्या मुलांना मानवतेची शिकवण देईन. त्या मूल्यांमुळे व्यक्तीची समज वाढते असे राहुल गांधी यांनी म्हंटल.राहुल यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील एका सदस्याने राहुल आणि प्रियांकाच्या शेतकरी संघर्षातील सहभागाचे कौतुक केले. यातून तुमची लोकांशी असलेली एकजूट दिसून येते, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांकांचं कौतुक केलं.
दरम्यान, रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने, राहुल गांधींना त्यांच्या तामिळनाडूतील मित्रांसाठी काही खास दिल्लीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती आणि त्यांनी छोले भटुरे आणि कुल्फी मागवली.