याद राखा! शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही; तुम्हाला कायदा मागे घ्यावेचं लागतील- राहुल गांधी

नवी दिल्ली । काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत कृषी कायद्यांवरून आक्रमक पवित्रा घेतला. केंद्रातील मोदी सरकार हे ‘हम दो हमारे दो’चं सरकार आहे,असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं नाव न घेता केला. शेतकरी हा देशाचा कणा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदा मागे घ्यावेचं लागतील असा इशाराच राहुल गांधी यांनी लोकसभेत दिला.

शेतकऱ्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर या देशात भूकबळी जातील, देशात रोजगार उपलब्ध होणार नाहीत, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल असं राहुल गांधी म्हणाले. ”सरकारने शेतकऱ्यांचा कणाच मोडलाय, ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केलीय, आता ते उभंच राहू शकत नाहीत. हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही, हे देशाचं आंदोलन आहे. शेतकरी फक्त अंधारात प्रकाश दाखवत आहेत. संपूर्ण देश हम दो हमारे दो यांच्याविरोधात एकजूट झाला आहे, असं राहुल गांधी म्हणाले. ”लिहून घ्या, तुम्ही म्हणत असाल, देशातील शेतकरी, मजूर, व्यापाऱ्याला तुम्ही पैशांनी नमवू शकाल असं वाटत असेल, पण लिहून घ्या, शेतकरी एक इंचही मागे हटणार नाही, शेतकरी-मजूर तुम्हाला हटवेल, पण तो एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला कायदे मागे घ्यावेच लागतील,” अशा आक्रमक शब्दांत राहुल गांधी यांनी सरकारला इशारा दिला.

”देशाला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात नोटबंदीपासून सुरु झाली. ही काही नवी गोष्ट नाही. हा पहिलाच प्रयत्न नाही. हे काम पंतप्रधानांनी हम दो हमारे दो साठी नोटबंदीपासून सुरु केलं. गरिबांचे पैसे घेऊन हम दो हमारे दोच्या खिशात टाकले. शेतकऱ्यांना बर्बाद केलं, जीएसटी आणून व्यापाऱ्यांना बर्बाद केलं, त्यानंतर आता पुन्हा शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर आणि मजुरांवर हल्ला केला.कोरोनाकाळात मजूर ओरडत होते, आम्हाला तिकीट द्या, पण या सरकारने ते दिलं नाही. या सरकारने केवळ व्यापाऱ्यांचं, उद्योगांचं भलं केलं. नोटबंदीनंतर दोन चार उद्योगपतींना मदत केली” असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेतील आपल्या भाषणात केला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

You might also like