हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबमधील मोगा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत राहुल गांधी ज्या ट्रॅक्टरमध्ये बसलेले होते. त्याच्या सीटवर कुशन लावलेलं होतं. राहुल गांधींचा हा फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाला. त्याचबरोबर भाजपा नेत्यांनीही त्यावरून खिल्ली उडवली होती.त्याला उत्तर देताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला.
ट्रॅक्टरवर कुशन वापरल्यासंदर्भात राहुल गांधी यांना पटयाळा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला.तेव्हा राहुल गांधी म्हणाले . “हा प्रश्न कधीच विचारला जाणार नाही की, नरेंद्र मोदी यांनी ८ हजार कोटींचे दोन विमान का खरेदी केले. ८ हजार कोटी. त्यात कुशन सोडा, पूर्ण पलंग आहे. म्हणजे एक पलंग नाही, ५० पलंग असतील त्यात. हे का विचारत नाही की आमचे पंतप्रधान मोदी यांनी ८ कोटींचं विमान खरेदी केलं. का तर त्यांचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही तसंच विमान आहे. याबद्दल कुणी विचारत नाही. राहुल गांधी रॅलीला गेले होते, ट्रॅक्टरमध्ये बसले होते कुणीतरी कुशन लावलं, हे विचारतात”, अशी टीका राहुल गांधी यांनी प्रश्नाला उत्तर देताना केली.
गद्दे की बात करने वाले 8000 करोड़ के जहाज पर चुप क्यों हैं? उस जहाज में गद्दा छोड़िए, पलंग है। 50 पलंग हैं।#किसान_न्याय_यात्रा pic.twitter.com/zuxKY0LM2x
— Congress (@INCIndia) October 6, 2020
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते राहुल गांधी सातत्यानं या कायद्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधत आहे. या कायद्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’