सोशल मीडिया अकाउंटवर ‘जोकर’सारखे खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालू नका!- राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ”तुमच्या सोशल मीडिया अकाउंटवर जोकरसारखे खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा, अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी वर केलं आहे. राहुल गांधी यांच्या रोख सोशल मीडिया अकाउंट बंद करणार असल्याचे सांगून माध्यमात खळबळ निर्माण करणारे आणि नंतर सोशल मीडियावर कायम राहण्याचे संकेत पुन्हा ट्विट करून देणाऱ्या पंतप्रधान मोदींकडे होता.

आपल्या ट्विटमध्ये राहुल लिहितात ”भारत आपत्कालीन परिस्थितीत असताना, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जोकर सारखे खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवू नका. कोरोना व्हायरसचे आव्हान स्वीकाराताना प्रत्येक भारतीयावर लक्ष केंद्रीत करा”.

”प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यात असे काही क्षण असतात जेव्हा त्यांच्या नेत्यांची कसोटी लागते. एका खऱ्या नेत्याचं संपूर्ण लक्ष हे येऊ घातलेलं मोठं संकट टाळण्यावर असतं. कोरोना व्हायरसचा परिणाम भारत व भारतीय अर्थव्यवस्थेवर देखील होवू शकतो. कोरोना व्हायरसचा आपल्या जनतेला व अर्थव्यवस्थेला अत्यंत गंभीर धोका आहे. मला वाटतं सरकार याकडे गांभिर्याने लक्ष देत नाही आहे. यावर वेळीच उपाययोजना केल्या नाहीतर धोकादायक ठरू शकतं.” असंही राहुल गांधी पुढे आपल्या ट्विटद्वारे म्हणाले आहेत.”

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असं आवाहन केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरु नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment