राहुल गांधी यांची नागपुरात आज जाहीर सभा…

Untitled design T.
Untitled design T.
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर प्रतिनिधी /  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज नागपूरमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता ही जाहीर सभा घेण्यात येणार आहे. नागपूर काँग्रेसचे अमेदवार नाना पटोले आणि रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारासाठी या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील ही दुसरी प्रचार सभा असून याआधी त्यांनी वर्धा येथे प्रचार सभा घेतली होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या गोंदियातील सभेत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली होती. याला राहुल गांधी काय प्रत्योत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केल्यानंतर ही पहिलीच सभा होणार आहे, त्यामुळे या सभेत राहुल गांधी काई बोलणार हे औत्सुक्याचे ठरणारे आहे. ही प्रचार सभा नागपूरच्या कस्तुरचंद पार्क येथे संध्याकाळी पाच वाजता होणार आहे.

इतर महत्वाचे –

खासदार संजय पाटील परराष्ट्र मंत्री असते तर देश विकून खाल्ला असता

अब्दुल सतार वर्षा भेटीवर … भाजप प्रवेशाची शक्यता

या चोरांचं सरकार परत येऊ देऊ नका – प्रकाश आंबेडकर