मुंबई | राहूल गांधी याच्या बोलण्यात एक तथ्य असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दम असतो, सरकारला त्या गोष्टीवर निर्णय घ्यावे लागलेले आहेत. तेव्हा ते काही बोलले असतील ते सरकारला गांभीर्याने घ्यावे लागेल असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. राहूल गांधी यांनी केंद्राला लसीकरणांबाबत सूचना केल्या होत्या, आताही काही सूचना केल्या आहेत. या प्रश्नावर संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले, आज दिल्लीत मोठे नेते भेटतायत म्हणजे मराठी आरक्षणांच्या मुद्यातून काहीतरी मार्ग निघेल. मराठा संघटनानी आपल्या प्रश्नासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झालेले आहे. महाराष्ट्रातील गंभीर विषय असून त्यातून मार्ग काढावा असे सांगतील.
संघटनात्मक बाधणीसाठी दाैरे सुरूच असतात. शिवसैनिकांना भेटणे, पक्षांचा विस्तार करण हे काम करत आहोत. उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा दिल्लीतील नेत्यांनी जळमट काढून फेकायला पाहिजे. आमचाही विश्वासघात केला, तेव्हा आम्हालांही वाईट वाटलेच.