राहुल गांधींनंतरच्या दहा पिढ्यासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करू शकत नाही- स्मृती इराणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ आयोजित जाहीर सभेत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. ”’मी माफी मागणार नाही, कारण मी राहुल सावरकर नाही असं मागे एकदा राहुल गांधी म्हणाले होते. त्यामुळं मला आज त्यांना सांगायचं आहे की तुमच्यानंतरच्या दहा पिढ्यांनासुद्धा सावरकरांच्या धाडसाशी बरोबरी करता येणार नाही.” असा घणाघात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.

 

इंग्रजांनी भारताचे विभाजन केले. त्यालाच काँग्रेसने आपले आदर्श बनवले. काँग्रेस पक्षाने देशाची फाळणी करण्याला सहमती दर्शवली कारण काँग्रेसला त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला पंतप्रधान व्हायचे होते, देशाची फाळणी ही देश हितासाठी नव्हे तर कुटुंबासाठी करण्यात आली होती, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी केला.

पाकिस्तान आणि काँग्रेसवर टीका करताना स्मृती ईराणी म्हणाल्या, पाकिस्तानात ज्यावेळी मुलींवर बलात्कार झाला, त्यांचे जबरदस्तीने लग्न करण्यात आले त्यावेळी काँग्रेसने ब्र शब्द बाहेर काढला नाही. पाकिस्तानात ईसाईंच्या धार्मिक स्थळावर बॉम्बस्फोट करण्यात आले. त्यावेळी सोनिया गांधी यांना रडू आले नाही. परंतु, बाटला हाऊस कांडावर मात्र त्यांना अश्रू अनावर झाले, अशी टीकाही स्मृती ईराणी यांनी केली. मुलीच्या हक्कासाठी नरेंद्र मोदी यांनी जो कायदा आणला आहे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानते, असे स्मृती ईराणी म्हणाल्या.

दरम्यान आज शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांनी सावरकरांना भारतरत्न देण्याची पुन्हा एकदा मागणी केली आहे. शिवाय, सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध करणाऱ्यांना अंदमानमध्ये सावरकरांनी शिक्षा भोगलेल्या ठिकाणी दोन दिवस पाठवायला हवं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं. संजय राऊत यांच्या या विधानाचं काही वेळातच सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी कौतुक केलं.

”संजय राऊत यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो कारण हे वक्तव्य म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलेला सल्लाच आहे असं सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा वीर सावरकरांना विरोध असतानाही संजय राऊत यांनी हा सल्ला देण्याचं धाडस दाखवलं त्याचं मी कौतुक करतो असंही रणजीत सावरकर म्हणाले आहेत.” एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं आज दिवसभर राहुल गांधी यांना राजकीय पटलावर सावरकरांवर केलेल्या विधानावरून लक्ष करण्यात आलं.

Leave a Comment