राहुलजी, आजची पत्रकार परिषद Toolkit स्क्रिप्टेड, २१६ कोटी डोस पुरवणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

prakash javadekar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था : कोरोना साथीने संपूर्ण देशाला ग्रासले आहे. अशातच कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र सध्या देशात लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. त्याचवरुन काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी देखील लसीकरण पूर्ण होण्याची मागणी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. मात्र याला आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले आहे. देशात येत्या डिसेंबर पर्यंन्त संपूर्ण लसीकरण पुरण होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे की, “मागील आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डिसेम्बर पर्यंन्त देशातील नागरिकांचे लसीकरण पूर्ण होणार असे सांगितले आहे. मागील आठवड्यात सादर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात २१६ कोटी डोसेस म्हणजेच १०८ कोटी नागरिकांचे लसीकरण कसे केले जाईल याची माहिती दिली आहे. कॉव्हक्सिन, कॅव्हिडशील्ड, झायड्स कॅडीला, स्पुतनिक , अशा देशातील आणि परदेशातील लसींद्वारे लसीकरण केले जाणार असल्याचे सांगितले आहे. त्याची टोटल २१६ कोटी होते राहुलजी. म्हणजेच समजून घ्या की देशातील लसीकरण डिसेम्बरच्या आधी पूर्ण होईल” अशी माहिती जावडेकर यांनी दिली आहे.

आजची पत्रकार परिषद Toolkitच्या स्क्रिप्टनुसार

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. तुम्हाला जर लसीकरणाची एवढीच काळजी आहे तर जरा काँग्रेसशासित राज्यांकडे लक्ष द्या. तिथे लसीकरणाचा गोंधळ सुरु आहे. त्यांना दिलेल्या लसींचा तर ते लाभ घेत नाहीत. आजपर्यंत दिलेल्या २० कोटी लसी या केंद्र सरकारने दिलेल्या आहेत तेही अगदी मोफत! तेव्हा लसीकरण वेगात सुरु आहे. डिसेंबरपर्यंत २१८ कोटी लसींच्या मात्रा प्राप्त होणार आहेत. ज्यामुळे १०८ कोटी नागरिकांचं लसीकऱण पूर्ण होणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.