सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा तालुक्यातील अतित गावच्या हद्दीत तीन पानी जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. बोरगाव पोलिसांनी कारवाई करत 4 जणांना ताब्यात घेतले असून 1 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अतित, बोरगाव परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतित गावात तीन पानी खेळणाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोरगाव पोलिसानी जुगारातील रोख रक्कम 10 हजार 100 रुपये, 2400 रुपये किमतीचे 4 मोबाईल 1 लाख 25000 रुपये किंमतीची KTM होंडा कंपनीची मोटारसायकल असा एकूण 1 लाख 37 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या विक्रम अधिकराव यादव (वय- 28 वर्षे), अमोल शिवाजी निकम (वय- 32 वर्षे), सागर हणमंत माने (वय- 34 वर्षे) आणि मारुती रामू चौगुले (सर्व रा. अतित) या चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.