रेल्वे प्रवास महागणार; आता तिकिटात जोडणार ‘हे’ विशेष शुल्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नवीन वर्षात तुमचा रेल्वे प्रवास आणखी महागणार आहे. आता प्रवाशांना विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकांवर डेव्हलपमेंट चार्ज भरावा लागणार आहे. यासंदर्भात रेल्वे बोर्डाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. हे शुल्क रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणीनुसार प्रवाशांकडून वसूल केले जाईल. याबाबत रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनला पत्र लिहिले आहे. SDF म्हणून 10-50 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. मात्र, हे शुल्क रिडेव्हलपमेंट होत असलेल्या रेल्वे स्थानकावरच लागू होईल.

शुल्काच्या विविध श्रेणी

अनारक्षित श्रेणीतील तिकिटासाठी 10 रुपये, तर आरक्षित श्रेणीतील प्रवाशांना 25 रुपये मोजावे लागतील. एसी क्लासच्या सर्व प्रवाशांना 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांवर 10 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. अधिका-यांनी सांगितले की,” बुकिंग दरम्यानच हे शुल्क रेल्वे तिकिटात जोडले जाऊ शकते. मात्र, अशी स्थानके सुरू झाल्यानंतरच हे शुल्क आकारण्यात येणार आहे.”

सर्व स्थानकांवर एकसारखेच SDF
अशा स्थानकांवर चढताना आणि उतरताना प्रवाशांकडून स्टेशन विकास शुल्क (SDF) आकारले जाईल. अशा स्थानकांवर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी स्टेशन डेव्हलपमेंट फीस ही वरील नमूद केलेल्या दरांच्या 50 टक्के असेल. दुसरीकडे, जर प्रवाशांनी अशा स्थानकांवर बोर्डिंग/एलिव्हेटिंग दोन्ही केले, तर त्या बाबतीत हे शुल्क लागू दराच्या 1.5 पट असेल.

Leave a Comment