RailTel IPO: 16 फेब्रुवारीला मिळणार कमाईची मोठी संधी, रेल्वेची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना करणार मालामाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना पुढील आठवड्यात आणखी एकदा कमाई करण्याची संधी मिळणार आहे. जर आपण शेवटच्या आयपीओमध्ये कमाई करण्याची संधी गमावली असेल तर आपल्यासाठी आणखी एक बम्पर फायदेशीर सौदा येत आहे. रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (RailTel Corporation of India) ही राज्य सरकारची कंपनी 16 फेब्रुवारी रोजी आयपीओ लाँच करणार आहे. यात आपण 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत पैसे गुंतवू शकाल. बीएसई आणि एनएसई या दोन्ही निर्देशांकांवर रेलटेलचे शेअर्स लिस्ट केले जातील. या आयपीओबद्दल आपल्याला तपशीलवार जाणून घेउयात –

आयपीओ बद्दल महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या-
>> या आयपीओचा प्राईस बँड प्रति शेअर 93-94 रुपये निश्चित केला गेला आहे.
>> या आयपीओ अंतर्गत 8,71,53,369 शेअर्सची ऑफर फॉर सेलद्वारे विक्री केली जाईल.
>> या ऑफरद्वारे 819.24 कोटी रुपये उभे करण्याची सरकारची योजना आहे.
>> ऑफरचा लॉट साइज 155 इक्विटी शेअर्सचा आहे.
>> या आयपीओमध्ये तुम्हाला किमान 14,570 रुपये गुंतवावे लागतील.
>> गुंतवणूकदार जास्तीत जास्त 13 लॉट साइजसाठी बोली लावू शकतात.

सप्टेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीचा नफा किती होता
जर आपण कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल चर्चा केली तर सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीची एकूण मालमत्ता 2482 कोटींच्या जवळपास होती. या व्यतिरिक्त कंपनीचा महसूल जवळपास 554 कोटी रुपये होता. कंपनीचा नफा सुमारे 46 कोटी रुपये होता.

कंपनीबद्दल जाणून घ्या
रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा भारतीय रेल्वेचा उपक्रम आहे. ही इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रदान करते. ही भारतातील सर्वात मोठी न्यूट्रल टेलीकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर कंपनी आहे. सप्टेंबर 2000 मध्ये कंपनीची स्थापना झाली. कंपनीचे उद्दीष्ट हे आहे की, देशभरात रेल्वे गाड्यांचे कंट्रोल ऑपरेशन्स, सुरक्षा तसेच ब्रॉडबँड आणि मल्टी-मीडिया नेटवर्क सुविधा पुरवून अतिरिक्त उत्पन्न मिळवणे. हे रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते.

या वर्षातील हा सहावा आयपीओ असेल
सन 2021 चा हा सहावा आयपीओ असेल. आतापर्यंत आयआरएफसी, इंडिगो पेंट्स, होम फर्स्ट फायनान्स, स्टोव्ह क्राफ्ट आणि ब्रूकफिल्ड इंडिया रिअल इस्टेट ट्रस्टचे आयपीओ आले आहेत. 15 फेब्रुवारीला नुरिका लिमिटेडचा आयपीओ देखील येणार आहे.

मनी कंट्रोल न्यूजनुसार कंपनीचे हरियाणामधील गुरुग्राम आणि तेलंगणातील सिकंदराबाद येथे डेटा सेंटर असून त्याद्वारे कंपनी आपली सेवा पुरविते. या आयपीओसाठी ICICI Securities, IDBI Capital Markets & Securities आणि SBI Capital Markets हे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.