हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : भारतीय रेल्वेला देशाची जीवन वाहिनी असे म्हंटले जाते. कारण आजही देशभरातील लाखो लोकं याद्वारे प्रवास करतात. मात्र रेल्वेतुन प्रवास करण्यापूर्वी स्टेशन वरून तिकीट खरेदी करणे ही प्रत्येक प्रवाशाची मोठी डोकेदुखी ठरते. कारण यासाठी तासनतास लांब रांगेत थांबणे खूप अवघड जाते. मात्र, आताच्या तंत्रज्ञानाच्या काळात रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रमुख स्थानकांवर तिकीट वेंडिंग मशिन बसवल्या गेल्या आहेत. मात्र या मशिनची संख्या खूपच कमी आहे.
आता या ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशीनची संख्या वाढवण्याची घोषणा रेल्वेने नुकतेच केली आहे. आता रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशिन बसवल्यामुळे प्रवाशांना सहजपणे तिकीट मिळेल. ज्यामुळे स्टेशनवरील लांब रांगेमध्ये तिकीट खरेदी करण्याच्या त्रासापासून सुटका होईल. यामुळे लोकांचा वेळही वाचेल आणि तिकीट काउंटरवरील गर्दीही कमी होईल. Railway

आता तिकीट मिळवणे झाले सोपे
हे जाणून घ्या कि, दक्षिण रेल्वे विभागाकडून आता विविध रेल्वे स्थानकांवर 254 अतिरिक्त एटीव्हीएम बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर एकूण 6 विभागांमध्ये 254 ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन बसवले जाणार आहे. याद्वारे प्रवाशांना अवघ्या काही मिनिटांत तिकिटे काढता येतील. याची खास बाब अशी याद्वारे सुपर फास्ट आणि मेल एक्सप्रेससहीत सर्व गाड्यांमध्ये अनारक्षित तिकिटे काढता येतील. याशिवाय प्लॅटफॉर्म तिकीटही घेता येईल. Railway

अशा प्रकारे काम करेल ‘हे’ मशीन
हे जाणून घ्या कि, हे वेंडिंग मशीन देखील बँकेच्या एटीएमप्रमाणेच काम करतात. एटीएममधून जसे पैसे काढतात त्याच पद्धतीने वेंडिंग मशीनमधूनही प्रवासासाठी तिकिटे काढता येतात. या मशीनद्वारे ज्या शहरामध्ये प्रवास करायचा आहे त्याचे नाव लिहून ते निवडा. त्यानंतर ज्यामधून प्रवास करायचा आहे. त्यानुसार ट्रेनची कॅटेगिरी निवडा (जसे की, सुपरफास्ट, मेल एक्सप्रेस किंवा पॅसेंजर इ.), यानंतर कॅश, स्मार्ट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करा. यानंतर मशीनचे तिकीट प्रिंट होऊन बाहेर येईल. Railway
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
Tax Saving Tips : आपल्या गुंतवणुकीचे अशा प्रकारे नियोजन करून वाचवा टॅक्स
Adani Group ला आणखी एक झटका !!! सिटी बँकेनंतर आता ‘या’ बँकेने देखील कर्ज देण्यास नकार
Pre-Approved Loan म्हणजे काय ??? जाणून घ्या ते घेण्याचे फायदे
Earn Money : मोबाईलवरून फोटो काढून कमवता येतील पैसे, जाणून घ्या त्यासाठीची पद्धत
Activa Electric Scooter : आपल्या पेट्रोल अॅक्टिव्हाला अशा प्रकारे बदला इलेक्ट्रिकमध्ये, त्यासाठी किती खर्च येईल ते पहा




