Railway Budget 2023 : तीन वर्षांत 400 वंदे भारत कोच बनवण्याचे सरकारचे लक्ष्य !!! चाकांसाठी देखील दिली ऑर्डर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway Budget 2023 : आज (1 फेब्रुवारी रोजी) देशाचा सर्वसाधारण Budget 2023 सादर केला गेला आहे. यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अपेक्षेप्रमाणे रेल्वेसाठी अनेक घोषणा केल्या. सरकारला 2.4 लाख कोटी रुपये खर्च करून संपूर्ण रेल्वेचे आधुनिकीकरण करायचे आहे. यासाठी चांगले रेल्वे स्थानक बांधण्याबरोबरच लक्झरी गाड्याही वेगाने धावण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. यामध्ये सेमी-हायस्पीड ट्रेन वंदे भारतवर सर्वाधिक भर दिला गेला आहे, ज्याचे उत्पादन आता अनेक पटींनी वाढवण्यात येणार आहे.

Union Budget 2022-2023: Finance Minister's Speech and Related Documents -  The Hindu Centre

त्याचप्रमाणे केंद्र सरकार कडून देशातील वंदे भारत ट्रेनद्वारे संपूर्ण देश जोडण्याच्या योजनेवरही काम केले जात आहे. त्यासाठी इन्फ्रा तयार करूनच अर्थसंकल्पात 75 हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. याद्वारे आता देशाच्या आणखी तीन भागात वंदे भारत ट्रेनचे 18 कोच तयार केले जातील. आतापर्यंत चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) मध्ये वंदे भारत डबे तयार केले जात होते. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात हरियाणातील सोनीपत, उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि महाराष्ट्रातील लातूर येथे आणखी तीन वंदे भारत उत्पादन युनिट उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील तीन वर्षांत सुमारे 400 वंदे भारत डबे तयार केले जातील असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. Railway Budget 2023

Secunderabad-Vijayawada Vande Bharat Express train launch: Ahead of  flag-off by PM Modi, key things to know

36 हजार चाकांची दिली ऑर्डर

यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वेचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातही वंदे भारत ट्रेन चालवण्याचे व्हिजन मांडले होते. त्यावेळी येत्या तीन वर्षांत 400 वंदे भारत डबे तयार करण्यात येतील, अशी घोषणा करण्यात आली होती. यासाठी युक्रेनला 140 कोटींमध्ये 36 हजार चाके तयार करण्याची ऑर्डरही देण्यात आली आहे. मात्र, रशियाबरोबरच्या युद्धामुळे हा पुरवठा विस्कळीत झाला. आता चेक प्रजासत्ताक, पोलंड, मलेशिया, चीन आणि अमेरिकेमध्ये यासाठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत. रेल्वेने स्टील अथॉरिटीलाही 1 लाख चाके तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Railways to start trials for third Vande Bharat Express train - The Hindu  BusinessLine

दर आठवड्याला तयार केले जाणार तीन कोच

दर आठवड्याला 2 ते 3 वंदे भारत ट्रेन तयार करता येतील अशा पातळीवर वंदे भारत डब्यांचे उत्पादन नेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. या गाड्या 1950 आणि 1960 च्या दशकातील धावणाऱ्या ट्रेनच्या जागा घेतील. त्यासाठी 80 हजार कोटींचे टेंडर देखील जारी केले गेले आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://youtube.com/live/uMj699Dopoo

हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता