नवी दिल्ली । भारतीय रेल्वेच्या कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे की, ई-श्रम पोर्टलवरील असंघटित क्षेत्रातील कामगारांची लिस्ट बदलण्यात आली आहे. आता ई-श्रम पोर्टलवर रेल्वे गोदामातील कामगारही जोडले गेले आहेत. या लिस्ट मध्ये गोदामातील कामगार हा व्यवसाय म्हणून आधीच दर्शविला आहे.
नवीन बदलामध्ये, रेल्वे गोदाम कामगारांच्या सोयीसाठी, ‘गोदाम कामगार’ या व्यवसायात थोडासा बदल करण्यात आला आहे आणि आता तो ‘गोदाम कामगार/रेल्वे गोदाम कामगार’ असा करण्यात आला आहे. याचा अर्थ गोदाम कामगार आता ई-श्रम पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. या कामगारांनाही ई-श्रम कार्ड मिळतील.
सध्या ई-श्रम पोर्टलवर सुमारे 400 व्यवसाय आहेत आणि आतापर्यंत 24.45 लाखांहून अधिक ई-श्रम कार्ड जारी करण्यात आले आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून कामगार मंत्रालयाने 38 कोटी कामगारांचे ई-श्रम कार्ड बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सरकारच्या या निर्णयावर गोदाम कामगारांचे प्रवक्ते परिमल कांती मंडल म्हणाले की,”कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात ओळख ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने गोदामातील कामगारांना मान्यता देऊन त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली आहे.”
ई-श्रम कार्डचे फायदे
असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकारी योजनांच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. ही योजना कामगार मंत्रालयाने ऑगस्ट 2021 मध्ये ई-श्रम पोर्टलच्या लॉन्चद्वारे सुरू केली होती. रोजंदारी मजूर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कोणत्याही बांधकाम क्षेत्रात किंवा असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हाला मिळू शकतो ‘हा’ फायदा
रोजंदारी मजुरांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळतो.
कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळतो.
पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेचा लाभ.
अपघातामुळे अपंगत्व आल्यास 2 लाख, परंतु 1 लाख रुपयांची आर्थिक मदत.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत, रजिस्टर्ड कामगाराच्या मृत्यूनंतर, कुटुंबातील सदस्यांना 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळू शकते.
रजिस्ट्रेशन कसे करावे ?
ई-श्रम पोर्टलवर रजिस्ट्रेशनसाठी, E-SHRAM च्या अधिकृत वेबसाइट, http://eshram.gov.in वर जा. मेन पेजवरील ‘Register on e-SHRAM’ या लिंकवर क्लिक करा. येथे तुमचा आधार लिंक केलेला मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर send OTP की वर क्लिक करा.