भारतीय रेल्वेत नोकरीची संधी, 238 जागांसाठी भरती; इथे करा अर्ज

Railway Recruitment 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांना सुवर्णसंधी आहे. भारतीय रेल्वेने रिक्त पदांच्या भरतीसाठी (Railway Recruitment 2023) अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत सहाय्यक लोको पायलट या पदासाठी 238 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 7 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार असून 6 मे 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – भारतीय रेल्वे (NORTH WESTERN RAILWAY, JAIPUR)
एकूण पदसंख्या – 238 पदे
भरले जाणारे पद – असिस्टंट लोको पायलट
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 7 एप्रिल 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 मे 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Railway Recruitment 2023)

1.असिस्टंट लोको पायलट – या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक मेकॅनिक (मोटर वाहन), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक, हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असावी. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

2. याशिवाय, बोर्ड लेटरला अनुसरून 20/08/2001, 28/08/2014 आणि 30/09/2015 रोजीच्या RBE क्रमांक 162/2001मध्ये रेल्वे बोर्डाने दिलेल्या सूचनांच्या अनुसार या पदांसाठी सूचित केलेल्या पात्रतेत बसणाऱ्या इंजिनीअरिंगच्या विविध शाखांचं एकत्रितपणे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही या पदांसाठी अर्ज करता येऊ शकतो.

वय मर्यादा –
1. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 1 जुलै 2023 रोजी 43 वर्षांपेक्षा जास्त नसावं.
2. OBC प्रवर्गातील उमेदवार असल्यास 45 आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय 47 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.rrcjaipur.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY