औरंगाबाद – औरंगाबाद शहरात ढगफुटी झाल्याने दाणादाण उडाली आहे. शहरात ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस बरसला आहे. यामुळे मात्र शहरवासियांची दाणादाण उडाली आहे. आज तब्बल १६६ मिमी ताशी वेगाने हा पाऊस आला.
तर तासाभरात ८७.६ मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती एमजीएम वेधशाळेने दिली आहे. या पावसाने निम्म्याहुन अधिक शहरात विजेचा पुरवठा खंडित झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच शहरातील राह्मणिया कॉलनी भागात रस्ते जलमय झाले होते, तर काही भागातून गाड्या वाहून गेल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
शहरात दिवसभर पावसाची रिमझिम बरसात सुरू होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पावसाने जोर पकडला आणि संपूर्ण शहराची वाताहत झाली. अनेक भागात घरात, गाड्यांमध्ये पाणी गेले