कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
जिल्ह्यात पावसाने जोरदार बॅटींग सुरू केली असल्याने जिल्ह्यातील सर्व धरणात पाणीसाठा वाढलेला आहे. त्यामुळे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात तब्बल 50 हजार क्युसेस पाण्याची आवक प्रतिसेंकद वाढली असून 4.29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर सातारा जिल्ह्यातील वीर धरण, उरमोडी धरण, मोरणा- गुरेघर मध्यम प्रकल्प, कण्हेर धरण, धोम बलकवडी धरण यामधून पाण्याचा विसर्ग आज सुरू करण्यात येणार आहे.
विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. सध्या कोयना धरणात गेल्या चोवीस तासात 4. 29 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुढील दोन दिवस घाट परिसरात मूसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट हमावान खात्याने दिला असून काल दिवसभर आणि आजही पावसाने झोडपून काढले आहे.
वीर धरण 100 टक्के भरत आले आहे. आज दुपारी 12 वाजता नीरा नदीच्या पात्रात 800 क्युसेस पाणी सोडले जाईल. उरमोडी धरणातून सकाळी 8 वाजता विद्युत गृहाद्वारे 500 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे. मोरणा धरणात सध्या 80.62% पाणी साठा असून सांडव्यावरुन 1496 घ.फू./से. विसर्ग विसर्ग आहे तो वाढवून आता 2474 घ.फू./से.ने सोडण्यात येणार आहे. आज सकाळी कण्हेर विद्युत गृहाद्वारे 550 क्यूसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आले आहे.
रात्रीत कोयना नवजा परिसरात 207 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना येथे 175 मि. मी तर नवजा येथे 226 मि. मी पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरला 197 मिलिमीटर पाऊस नोंदला गेला आहे. पावसाचा जोर वाढल्याने अनेक धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. तेव्हा नदीकाठी जाणे लोकांनी टाळवे असे आवाहन केले आहे.