कोयनेला पाऊस वाढला : धरणाचे आज दुसऱ्यांदा दरवाजे उचलणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या जोरदार पावसामुळे आज मंगळवारी धरणात 101.57 टीएमसी पाणीसाठा साठलेला आहे. धरणात सध्या 8 हजार 573 क्युसेस पाण्याची आवक होत असल्याने पायथा विद्युत गृहातून 1050 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर आज मंगळवारी दि. 13 रोजी दुपारी 2 वाजता कोयना धरणाचे 6 वक्रदरवाजे 1 फुट 6 इंच उघडून 12 हजार 891 क्युसेक्स विसर्ग सोडणेत येणार आहे.

आज दि. 13 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 8:00 वाजता धरणाची पाणी पातळी 2160 फूट 08 इंच झाली असून धरणामध्ये 101. 57 TMC (96.50%) पाणीसाठा झाला आहे. आज कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 1 फुट 6 इंच उचलण्यात येणार आहेत.

कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना क्षेत्रात 116, नवजा 142 तर महाबळेश्वर येथे 122 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. धरण पायथा विद्युत गृहामधून 1050 क्युसेक्स विसर्ग चालू असलेने कोयना धरणातून नदीपात्रात एकूण 13 हजार 941 क्युसेक्स विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.