कोयनेत पावसाचा जोर वाढला : धरणातून 23 हजार 910 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून पाणीपातळीत झपाट्याने वाढ होवू लागल्याने दुपारी 1 फुटांवर उचलेले धरणाचे वक्र दरवाजे अडीच फुटावर करण्यात आले आहेत. धरणात प्रतिसेकंद सरासरी 23 हजार 910 क्युसेक्स पाण्याची आवक असून वक्र दरवाजातून प्रतिसेकंद 22 हजार 730 क्युसेक्स व पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक्स असे प्रतिसेकंद एकूण 23 हजार 780 क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयना धरणात सध्या 103.95 टीएमसी पाणीसाठा असल्याने पाणीसाठवण क्षमता लक्षात घेऊन धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी संध्याकाळी 5 वाजता एका फूटावरून अडीच फूट करण्यात आले. धरणाची एकूण 105. 25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या 103.95 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. आता धरणात केवळ 1.30 टीएमसी इतकेच धरण रिकामे आहे. धरणाची साठवण क्षमता व अद्यापही प्रलंबित असलेला पाऊस लक्षात घेता कोयना धरण व्यवस्थापनाने रविवार पासून पुन्हा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे एका फुटाने दरवाजे उचलण्यात आलेले होते.

तर संध्याकाळी 5 वाजता सहाही दरवाजे अडीच फुटांनी वर उचलून त्यातून 22 हजार 730 क्युसेक्स व पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून 1हजार 50 क्युसेक्स असे एकूण 23 हजार 780 क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहेत.

Leave a Comment