गोटे गावच्या सरपंचपदी रईसा देसाई बिनविरोध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गोटे (ता. कराड) गावच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. रईसा मुजिब देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आ. बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यात सिंहांचा वाटा असणारे लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, गोटे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच मुस्लिम जमातीचे अध्यक्ष ताहेरभाई आगा, तंटामुक्ती माजी अध्यक्ष अल्लाउद्दीन देसाई, उपसरपंच सुधीर पवार, हाजी वलिशाभाई देसाई, हाजी रज्जाकभाई पटेल, हाजी याकूब आगा, तंटामुक्ती अध्यक्ष गंगाराम पवार, माजी उपसरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच अशोक पवार, ग्रामपंचायत सदस्य ॲड. साबिर मुल्ला, राहूल पुजारी, प्रविण शिंदे, वहिदा शेख, आसिफ शेख, अय्याज सय्यद, मुजिब देसाई, मुराद आगा, राजूभाई आगा आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, गावा- गावात निवडणुका लागल्या की विषमता निर्माण होत असते. त्यामुळे गावचा विकास खुंटतो, तेव्हा निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. तरूणांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे, गरजेचे आहे. गोटे गावाने निवडणूक एकविचाराने बिनविरोध केलीच परंतु त्यानंतर सरपंचपदही बिनविरोध करून एक आदर्श निर्माण केला आहे.