हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील काही दिवसापासून राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होते. मधल्या काळात हि चर्चा फिस्कटली कि काय असं वाटत असतानाच राज्य सरकारने शाळेत हिंदी भाषेचा नियम काढला आणि मराठी भाषेच्या रक्षणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे सूर पुन्हा एकदा जुळले. हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसेने 5 जुले तर उद्वव ठाकरेंच्या शिवसेनेने 7 जुलैला शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मोर्चा जाहीर केला होता. मात्र आता दोन्ही पक्ष एकत्रित मोर्चा काढणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज आणि उद्धव ठाकरेंचे फोटो शेअर करत याबाबत घोषणा केली आहे.
संजय राऊतांचे ट्विट काय?
संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा जुना एकत्रित फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी म्हंटल कि, महाराष्ट्रातील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्रच मोर्चा निघेल …. जय महाराष्ट्र!! … संजय राऊत हे मातोश्रीचे एकनिष्ठ आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जातात. संजय राऊत जे काही बोलतात किंवा सांगतात ती ठाकरे गटाची अधिकृत भूमिका म्हंटली जाते. त्यामुळे संजय राऊतांच्या प्रत्येक शब्दाला महत्व असते. आज त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मोर्चात एकत्र दिसतील असं म्हंटल आहे. त्यामुळे खरंच ५ जुलैला मराठी माणसाच्या आयुष्यातील खास क्षण बघायला मिळेल का याकडे लक्ष्य लागलं आहे.
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k
महाराष्ट्राच्या प्रश्नासमोर काहीही मोठं नाही…. त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना जरी या मोर्चात सहभागी झाली तरी चालेल … आम्ही त्यांच्या पक्षातील लोकांशी बोलू असं राज ठाकरेंनी कालच म्हंटल होते. तसेच सर्वच मराठी माणसांनी, राजकीय नेत्यांनी कलाकारांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं राज ठाकरे म्हणाले होते. तेव्हापासूनच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चाचे एकत्रित नेतृत्व करतील का? असा प्रश्न प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आला होता. अखेर आज संजय राऊतांनी राज आणि उद्धव ठाकरे यांचे एकत्रित फोटो शेअर करत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. मराठी माणसासाठी हा खास क्षण असणार आहे.




