Raj And Uddhav Thackeray : गुलाल उधळत या, आम्ही वाट पाहतोय!! ठाकरे बंधूंचं राज्यातील जनतेला एकत्रित आवाहन

Raj And Uddhav Thackeray (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Raj And Uddhav Thackeray। पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) या ठाकरे बंधूनी तीव्र विरोध केल्यानंतर राज्य सरकारने २ पाऊले मागे जात हा जीआर रद्द केला… त्यामुळे ठाकरेंचा बंधूंचा प्रस्तावित मोर्चा रद्द झाला असला तरी ५ जुलैला विजयी मेळावा मात्र घेण्यावर दोघेही ठाम होते. आज सकाळीच सामनातून हा मेळावा वरळी येथील डोम मध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली. आता ठाकरे बंधूनी एकत्रितपणे या मेळाव्याचे आवाहन महाराष्ट्रातील तमाम मराठी जणांना केलं आहे. त्याबाबतचे एक पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वर पोस्ट करण्यात आलं आहे.

काय आहे पत्रकात? Raj And Uddhav Thackeray

मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो,” असं या पत्रात म्हटलं आहे. तसेच पत्रात पुढे ठाकरे बंधुंनी, “त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे,” त्यामुळे “वाजत गाजत या, जल्लोषात, गुलाल उधळत या !! आम्ही वाट बघतोय…!” असं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. पत्राच्या शेवटी, “आपले नम्र” असं म्हणत एकाच ओळीत “राज ठाकरे – उद्धव ठाकरे” या दोघांची एकत्रित नावे टाकण्यात आली आहेत.

विजयी मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये त्यादृष्टीने बैठकाही होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब,वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोमवारी रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची झाली भेट. सांताक्रुजच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये या तिन्ही नेत्यांची भेट झाली. विजयी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वरळी डोमची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेवर चर्चा झाली. खूप वर्षांनी आणि राजकारणात प्रथमच ठाकरे बंधू (Raj And Uddhav Thackeray) एक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी हा सोनेरी क्षण म्हणावा लागेल.