राजकारणातील मोठी बातमी! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र; चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडत असताना एका वेगळ्या चर्चेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती चर्चा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या भेटीची. एका कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळाच्या चर्चेला उधाण आले आहे. तसेच या भेटी दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत देखील तर्क वितर्क लावले जात आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ठीक अकरा वाजता दादर येथील हिंदू कॉलनी मधील सभागृहामध्ये राज ठाकरे यांच्या भगिनी जय जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानिमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. मात्र या दोघांमध्ये प्रत्यक्षात कोणतीही चर्चा झाली नाही किंवा संवाद झाला नाही असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे यादेखील उपस्थित होत्या. तसेच त्यांच्याबरोबर उद्धव ठाकरे देखील कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कुटुंबातल्या सदस्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच, नविन जोडप्याला शुभेच्छा देखील दिल्या. मात्र या सर्व कार्यक्रमांमध्ये ते राज ठाकरेंची संवाद साधताना दिसले नाहीत.