औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबाद येथे जोरदार सभा झाली. यावेळी राज यांनी शिवसेनेसह विरोधकांवर जोरदार हल्ला केला. सभा होणार कि नाही याबाबत अनिश्चितता होती. मात्र तरीही सभा झाल्याने मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सभा सुरु होऊन पाच दहा मिनटं झाली तोच गर्दीत काहीतरी गोंधळ झालेला राज यांना दिसला. त्यानंतर जर कोणी टाळकी सभेत काही वेडंवाकडं करायला आली असतील ना तर तिथल्या तिथं धरून हाणा असा इशारा राज यांनी भर सभेतूनच दिला.
काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray Aurangabad Sabha
माझ्या यापुढे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात होणार आहेत. तसेच विदर्भातही सभा होणार. मी कोकणातही जाणार आहे. मी पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. कितीही झाकलं तरी सूर्य उगवायचा थोडीच राहणार आहे? असं म्हणत राज यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह सध्या अनेक समस्या आहेत. पण मी आज काही महत्वाच्या प्रश्नांवर बोलणार आहे.
शरद पवारांना मी त्यांना नास्तिक म्हटलेलं चांगलच झोम्बलाय. मी असं म्हटल्यानंतर लगेच देवाच्या पाया पाडतानाचे फोटो समोर आणले गेले. पण शरद पवार हे नास्तिक असल्याचं त्यांच्या मुलीने स्वतः संसदेत सांगितलं आहे असं म्हणत राज यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
मी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांना व्यवस्थित वाचलं आहे. आपण आपल्या सोईनुसार न वाचता त्यांनी लिहिलेलं सर्व वाचायला हवं. अशी राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या समर्थकांनी बाबासाहेबी पुरंदरे यांना त्रास द्यायला सुरवात केली. पुरंदरे केवळ ब्राह्मण असल्यानेच त्यांना त्रास देण्यात आला असंही राज यांनी म्हटलं.
छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगडावरील समाधी ज्यांनी बांधली ते कोण होतं? लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांची समाधी बांधली. टिळकांनी पाहिलं वृत्तपत्र काढलं त्याच नाव होतं मराठा. हे शरद पवार तुम्हला सांगणार नाहीत असं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
– हि बातमी सातत्याने अपडेट होत आहे. लेटेस्ट अपडेटसाठी रिफ्रेश करा.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/5101908236568091/