उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार; मनसे आणि भाजपकडून जोरदार तयारी सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार आता राज ठाकरे पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar mohol) यांच्या प्रचारार्थ पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. उद्या ठीक 6 वाजता राज ठाकरे यांचे पुण्यातील सारसबाग परिसरात ही सभा पार पडेल. यापूर्वी ही राज ठाकरे यांची नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा पुण्यात तोफ धडाडली होती.

राज ठाकरेंच्या यापूर्वी झालेल्या सभेच्या नियोजनासाठी भाजप आणि मनसेच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातील सभेसाठी मनसे आणि भाजप एकत्र नियोजन करणार आहे. या सगळे संदर्भात माहिती देत बाळा नांदगावकर यांनी सांगितले आहे की, “पुणेकर मतदार संघातील युवक वर्ग राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यास उत्सुक असतो. मनसेला मानणारा मोठा मतदार पुणे लोकसभा मतदारसंघात आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्व जण काम करत आहोत. सभेला चांगली गर्दी होईल असा विश्वास आहे. सभेमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहोत.”

दरम्यान, येत्या 17 मे रोजी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही पक्षांची शक्तिप्रदर्शन आणि प्रचार सभा पार पडणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांकडून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज करण्यात आला आहे. परंतु नेमके मैदान कोणाला दिले जावे याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. महापालिकेने सांगितले आहे की, शिवाजी पार्क मैदानासाठी 2016 च्या शासन निर्णयानुसार दोन्ही पक्षांनी अर्ज निवेदनासहित दिले आहेत. याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. दुसऱ्या बाजूला, शिवाजी पार्क मैदानासाठी मनसेने सर्वात पहिला अर्ज केला असल्याचा दावा मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे हे मैदान नेमके कोणाच्या वाट्याला येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.