Tuesday, January 31, 2023

सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून…; विरार दुर्घटनेनंतर राज ठाकरेंनी व्यक्त केला शोक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरारमधील वल्लभ कोव्हिड रुग्णालयाला आग लागल्याने 13 जणांचा होरपळून मृत्यू झाला. एसीचा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच राज्य सरकारला काही सूचना देखील केल्या आहेत.

राज ठाकरे यांनी ट्विट करून विरारमधील घटनेवर तीव्र शोक व्यक्त केला आहे. आज विरार मधल्या हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. परवा नाशिकमधली घटना असो की काही दिवसांपूर्वीची भंडारा आणि भांडूपमधील घटना असोत, या घटना दुर्दैवी आणि क्लेशदायी आहेत, असं सांगतानाच सध्याच्या परिस्थितीत सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य. पण म्हणून या घटनांमधून काही बोध घ्यायचाच नाही असं नाही. असे राज ठाकरे यांनी म्हंटल.

- Advertisement -

तसेच सरकारने तातडीने जबाबदार अधिकाऱ्यांच्या टीम्स तयार करून, प्रत्येक रुग्णालयातील व्यवस्थांच, अग्निसुरक्षा यंत्रणांचं तात्काळ ऑडिट करून घ्यायला हवं. आणि ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, अशा सूचनाही राज यांनी केल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.