हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी मुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्या नंतर त्यांचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष होत. अखेर राज ठाकरे ट्विटर वर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
एखादा माणूस ज्यादिवशी आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजू लागतो त्यादिवसापासून त्याचा ऱ्हासाकडे प्रवास सुरु होतो”, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलेलं नाहीये पण अप्रत्यक्षणपणे त्यांनी टीका केली आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भोंग्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं होत. जेव्हा मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलनं करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून राज यांनी उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत जोरदार टीका केली होती. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही! असं राज यांनी म्हंटल होत